विज्ञान आश्रम हे इंडियन इन्स्टिटयुट ऑफ एज्युकेशन (IIE) पुणे यांचे एक केंद्र आहे. शास्त्रज्ञ जे नंतर शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले अशा कै. डॉ.एस.एस.कलबाग यांनी १९८३ साली शैक्षणिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान आश्रमाची स्थापना केली.
आमच्यासाठी 'विज्ञान' याचा अर्थ 'सत्याचा शोध' आणि 'आश्रम' म्हणजे 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे प्रतीक., आमच्यासाठी, जिथे सर्व जण समान आहेत अशी संघटना म्हणजे जुन्या गुरुकुल पद्धतीची आधुनिक आवृत्ती आहे असे म्हणता येईल.'
विज्ञान आश्रमाच्या शैक्षणिक कार्यक्रमाला, 'इन्ट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी' (IBT), भारताच्या चार राज्यांमधील १२२पेक्षा अधिक महाविद्यालयांनी स्वीकारले आहे.
शिक्षण प्रदान करण्याच्या पद्धतीची गती आणि गुणवत्ता यामध्ये वाढ करण्यासाठी आश्रमाने नवीन माहिती तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.
अनेक सरकारी आणि खासगी संस्था आणि वैयक्तिक देणगीदारांनी आश्रमातर्फे राबविल्या जाणार्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला आहे. आम्हाला पाठिंबा दिलेल्या काही संस्था 'सीएपीएआरटी' (मिनिस्ट्री ऑफ रुरल डिपार्टमेंट), 'डिपार्टमेंट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी', 'सर दोराबजी टाटा ट्रस्ट', 'हिन्दुस्तान लीव्हर', 'लेन्ड-अ-हॅन्ड-इंडिया', 'असोसिएशन फॉर इंडियाज डेव्हलपमेंट (AID)’, 'आशा फॉर एज्युकेशन', 'एमएचआरडी' इ.आहेत.
इंडियन इन्स्टिटयुट ऑफ एज्युकेशन (IIE)च्या विश्वस्त मंडळाने नेमलेली व्यवस्थापन समिती विज्ञान आश्रमाचे व्यवस्थापन सांभाळते.
डॉ.अरविंद गुप्ता ( अध्यक्ष ), डॉ.अरुंधती गिरी, श्री.विजयकुमार, श्री.अशोक कलबाग, श्री.प्रवीण महाजन, श्री.सुनील कुलकर्णी, श्रीमती मीरा कलबाग आणि डॉ.योगेश कुलकर्णी ( संचालक आणि सभासद सचिव )
विज्ञान आश्रम हा पुण्यापासून अंदाजे ७० किमी. अंतरावर असलेल्या पाबळ या गावी आहे. राजगुरुनगर-शिरूर रस्त्यावर हा आश्रम वसविण्यात आला आहे. पाबळ या गावाची लोकसंख्या १०,००० आहे. कित्येक लहान-लहान वाडयावस्त्या पाबळला जोडलेल्या असल्याने पाबळ हे मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण आहे.
पाबळ हे दुष्काळप्रवण असल्याने खर्या अर्थाने भारतीय खेडयाचे प्रतिनिधित्व करते. पाबळ येथे विज्ञान आश्रम वसविण्यामागे अशी कल्पना आहे की आम्ही आश्रमात जे काही करू त्याची तशीच्या तशी प्रतिकृती भारताच्या इतर कोणत्याही भागात करता येईल.
अधिक माहितीसाठी : http://vigyanashram.com/Default.aspx