राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशनविषयी |
|
|
|
ध्येये आणि उद्दिष्टे
|
|
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने बदल, विकास आणि प्रगती घडवून आणण्यासाठी एक कारक / माध्यम होणे; विज्ञापीठे, संशोधन आणि विकास संस्था, उद्योगधंदे आणि इतर संस्था यांच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या अनुप्रयोगांचा विकास करण्यासाठी, त्यांचात सुधारणा करण्यासाठी समांतर पातळीवर आंतरक्रिया घडवून आणून उत्तेजन देणारा प्रमुख प्रवर्तक म्हणून कार्य करणे; अभ्यास करणे, तंत्रज्ञान आत्मसात करणे, प्रकल्प हाती घेणे, अभ्यासक्षेत्राच्या ठिकाणी प्रात्यक्षिके देणे, आवश्यक प्रशिक्षण देणे, सल्लागार आणि प्रकाशित साहित्य यांच्या साहाय्याने अनुप्रयोगांचा प्रसार करणे; निर्धारित प्रकल्पांसाठी आवश्यक बीज भांडवल आणि इतर इनपुट्स / प्राथमिक सुविधा पुरविणे; प्रयोगशाळा तसेच संशोधनाद्वारे निर्माण झालेल्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करून त्याचे व्यापक प्रमाणात उपयोजन व्हावे यासाठी प्रशिक्षक किंवा साहाय्यक म्हणून काम करणे; शासकीय / सरकारी विभागांतर्गत नवीन कल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेणे / साहाय्य करणे, उदाहरणार्थ, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानावर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी, आरोग्य क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, शाश्वत आर्थिक प्रगतीसाठी इ.; अनुप्रयोगांशी संबंधित संशोधन आणि विकास कार्यक्रम राबविण्यासाठी जे भाग किंवा शाखा येथे सुविधांचा अभाव असेल किंवा त्या अपुर्या असतील अशा ठिकाणी संस्थात्मक पातळीवर सोयीसुविधा निर्माण करणे; कमिशन उचित अशा प्राथमिक संशोधनासाठीदेखील मर्यादित प्रमाणात मदत देऊ शकेल. मात्र, कमिशनची मुख्य भूमिका ही उपयोजित करता येईल आणि त्या उपयोजनाचा व्यापक प्रमाणात वापर होईल अशा प्रकारच्या संशोधन तसेच विकास कार्याला चालना देणे अशी आहे. |
|
अधिक माहितीसाठी : https://rgstc.maharashtra.gov.in/