'एनकेएन' हे मल्टी गिगाबाइट भारतभर विस्तारलेले अद्ययावत नेटवर्क आहे जे संपूर्ण देशातील ज्ञानाशी संबंधित शिक्षणसंस्थांना आधारस्तंभ ठरेल असे संघटित उच्च क्षमतेचे नेटवर्क उपलब्ध करून देते. अशा प्रकारे ज्ञानावर आधारित नेटवर्कचा हेतू हा संशोधनासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवून आणि उत्तम प्रशिक्षित व्यावसायिकांच्या समूहाची निर्मिती करून देशात दर्जेदार संशोधन संस्था उभारण्याचा शोध मनापासून घेणे हा आहे. विविध शैक्षणिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेले शास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी यांना मानवी विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि नवीन क्षेत्रांमध्ये परस्पर सहयोगातून काम करण्यास सक्षम करण्याचे कार्य 'एनकेएन' करत आहे.
जागतिक स्तरावर उल्लेखनीय असे संशोधन आणि विकास कार्य करत असलेल्या आघाडीच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक संस्थांना अविरतपणे एकमेकांशी जोडणारे स्मार्ट अल्ट्रा हाय बॅन्डविड्थ नेटवर्क अशी 'एनकेएन' ची रचना करण्यात आली आहे. मूलत:च स्वयंप्रेरित अशी एमकेएनची रचना ही नजीकच्या काळातील गरजांबरोबरच भविष्यातील दीर्घकालीन गरजाही विचारात घेते.
ही 'एनकेएन'ची काही ठळक वैशिष्टये आहेत:
- ज्ञान आणि माहिती यांचे आदानप्रदान करण्यासाठी संबंध प्रस्थापित करणे.
- हवामान प्रारूपीकरण यासारख्या नवीन क्षेत्रामध्ये सहयोगातून संशोधन करण्यास चालना देणे.
- वैद्यकशास्त्रासारख्या विशेष क्षेत्रांमध्ये, इन्फो-बायो-नॅनो टेक्नॉलॉजीसारख्या उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता भासणार्या क्षेत्रांमध्ये दूरशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
- माहितीच्या आदानप्रदानासाठी अति उच्च गती ई-गव्हर्नन्सचा आधार उपलब्ध करून देणे.
विविध सेवांकरिता नेटवर्क, सुरक्षा आणि डिलिव्हरी प्रारूपे या क्षेत्रांमध्ये होणार्या संशोधनाकरिता चाचणी क्रमादेशावली म्हणूनही 'एनकेएन' भूमिका पार पाडेल. 'एनकेएन' हा नवीन उपक्रम असल्यामुळे अस्तित्वात असलेल्या उपक्रमांना तो मर्यादित गुंतवणूक करून अधिक परिणामकारक होण्याची खात्री करून घेण्यासाठी लाभदायक ठरेल.
अधिक माहितीसाठी : http://www.nkn.in/index.php