एसव्हीईआरआय / स्वेरी
श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रीसर्च इन्स्टिटयुट (एसव्हीईआरआय / स्वेरी ) - धर्मादाय विश्वस्त संस्था
जेव्हा तरुण, उत्साही, प्रामाणिक, सुशिक्षित आणि अनुभवी देशभक्त यांचा समन्वय निर्माण केला जातो तेव्हा एखाद्या स्मारकाच्या स्वरूपातील संस्था अस्तित्वात येतात. श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रीसर्च इन्स्टिटयुट (एसव्हीईआरआय / स्वेरी ) हे याचे उत्तम उदाहरण आहे.
'एसव्हीइआरआय / स्वेरी,' या धर्मादाय विश्वस्त संस्थेने आपला पहिला महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आणि पंढरपूर येथे 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन' ( AICTE ), नवी दिल्ली आणि महाराष्ट्र सरकार यांची मान्यता मिळवून अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाला 'अ' दर्जाचे प्रमाणपत्र मिळाले असून 'नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रीडिटेशन' (NBA) यांची अधिकृत मान्यता, आयएसओ ९००१:२००८ प्रमाणपत्र आणि 'इन्स्टिटयुशन ऑफ इंजिनीअर्स' (भारत / इंडिया), कोलकाता यांची अधिकृत मान्यता मिळालेलीआहे.
सातत्यपूर्ण विकासाची प्रक्रिया राबविताना, 'एसव्हीईआरआय / स्वेरी'ने २००६-०७ या शैक्षणिक वर्षापासून बी.फार्मसी आणि डी.फार्मसी हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत आणि २००८-०९ या शैक्षणिक वर्षापासून डिप्लोमा इन इंजिनीअरिंग ( पॉलिटेक्निक ) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अधिक माहितीसाठी : http://coe.sveri.ac.in/index.php