परम स्कूलमध्ये आपले स्वागत आहे !
नवशिक्षणाने त्याच्या सर्व संकल्पना, कार्यपद्धती आणि सर्जनशीलतेची तसेच सांस्कृतिक उद्दिष्टे गाठण्यासाठी स्थानिक आणि प्रादेशिक पातळीवर सर्वसमावेशक आणि स्वायत्त प्रगतीसाठी साहाय्यक / उपयुक्त ठरेल असे जागतिक माध्यम शोधले पाहिजे. आमचा हेतू साध्य करण्यासाठी जागतिक-स्थानिक पातळीवरील प्रारूप योग्य ठरेल कारण ते आमच्या उच्चस्तर-निम्नस्तर (जागतिक-स्थानिक) या दृष्टिकोनाला चालना देईल. यामध्ये वैश्विक ज्ञान, जागतिक कीर्तीचे गुणवत्तापूर्ण प्राध्यापक, विविध संसाधनांच्या साहाय्याने उपलब्ध करून दिली जाणारी अतिशय महत्त्वाची माहिती यांचा समावेश आहे; आणि मूलभूत तसेच उपयोजित स्वरूप असलेले स्थानिक पातळीवरील अध्ययन ते सामाजिक-सांस्कृतिक तसेच जैव-पर्यावरणीय संदर्भ यांचा समावेश असलेले जागतिक माहितीचे स्थानिकीकरण हा निम्नस्तर-उच्चस्तर दृष्टिकोन.
आम्ही सर्वसाधारणपणे असे म्हणतो की आमचा बी.एड ( ई-एज्युकेशन ) कार्यक्रम हा विद्यापीठ शिक्षणामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व पदवी कार्यक्रमांना अनुकूल आहे. मूलभूत परम विद्यापीठ / युनिव्हर्सिटी किंवा सामाजिक विकासावर केंद्रित मेटा युनिव्हर्सिटी यामध्ये आधारभूत संरचनेचे पाच घटक / विभाग यांचा समावेश असला पाहिजे:
१. ई-प्लॅटफॉर्म आणि अध्ययनाला साहाय्यक ठरतील अशा सुविधा आणि सेवा, जसे की ई-पोर्टफोलिओ, वेगवेगळ्या ठिकाणांहून सहभागी होता येणारा वर्ग, मेटा-डाटाबेस इ.
२. अध्ययन, विकास आणि प्रदाता कार्ये यांना साहाय्य करणारी मुक्त शिक्षण संसाधने आणि विकी (Wiki) ऑर्गनायझेशन्स / संस्था
३. विद्यार्थी, प्रदाते आणि शिक्षणाला पाठिंबा देणारे यांची सामाजिक स्तरावरील शैक्षणिक जाळी / नेटवर्क्स
४. जनसापेक्ष-व्यक्तिसापेक्ष दृष्टिकोनांसह गुणवत्तेची खात्री आणि सुधारणा पद्धती
५. गटाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अध्ययन व विकास प्रकिया आणि कार्यक्रम यांमध्ये सहभागी झालेल्या संस्थांसाठी स्वराज किंवा स्वयंशिस्त यांचे तंत्र
या आधारभूत संरचनेचे मध्यवर्ती / जागतिक- स्थानिक घटक आहेत; ई-प्लॅटफॉर्मशी संबंधित आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांचा विकास घडवून आणणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, नवशिक्षणाच्या स्वरूपामध्ये ई-एज्युकेशनला उत्तेजन देणे यासाठी ते साहाय्यक प्रणालीची एकत्रितपणे स्थापना करतात.
उत्कृष्ट कामगिरी आणि भविष्य घडविणे यासाठी रुपरेषा आणि परिस्थिती यांच्यावर आधारित भूमिका वठविणे
रुपरेषा-परिस्थिती यावर आधारित शिक्षण आणि भूमिका वठविणे हे रचनावादीशिक्षण आणि विकास यांना एक नवीन दृष्टिकोन देतात. हा दृष्टिकोन मानवकेंद्री / समाजकेंद्री असून परिस्थितीच्या संदर्भातील कामगिरी आणि कल्पकता तसेच निर्मिती / सर्जनशीलता यांचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याची निष्पत्ती वैयक्तिक आणि सामाजिक संपत्ती निर्माण होऊन स्थानिक समस्या आणि प्रश्न सोडविण्यावर स्पष्ट व निश्चित परिणाम होण्यामध्ये होते.
सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आणि फलदायी असे उपलब्ध झालेले कार्य ही जागतिक संदर्भातील परिस्थितीजन्य विकासासाठी शिक्षण प्रसंगोचित करण्यासाठीची आवश्यकता आहे. भारतासारखा विकसनशील देश आणि समाज यांच्यामध्ये दारिद्रय, विषमता, बेरोजगारी आणि संपत्तीची निर्मिती या त्याच्या समस्या सोडविण्यासाठी सामाजिक / राष्ट्रीय विकासाशी शिक्षणाचा संबंध जोडण्याची महत्त्वाकांक्षा नेहमीच ठेवण्यात आली आहे.
एकमेकांशी कायमच संपर्कात असणार्या समाजाच्या इन्फर्मेशन ॲन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीवर आधारित कार्यपद्धतीशिवाय पहिल्या दशकाने मुक्त संसाधन आणि सामाजिक जाळे तयार करण्याच्या चळवळींची भर घातली. मुक्त संसाधने आणि जोडले जाणे, आधुनिक पद्धतीने आयोजन आणि निर्मिती या शक्यतेने शैक्षणिक आणि विकास प्रक्रिया यांमध्ये विविध पैलूंची भर घातली आहे.
2G आणि 3G/4G तंत्रज्ञानांच्या सर्वव्यापी अस्तित्वाद्वारे A3ने जोडलेले लोक तयार करण्यामध्ये भारत प्रगती करत आहे आणि त्याने आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांना परवडण्याजोग्या टॅबलेट पीसीचा परिचय करून दिला आहे. (७ इंची टॅबलेट आकाश- II विद्यार्थ्यांना असलेली ५०% सूट धरून साधारणपणे रु. १०६५/- इतक्या किमतीला पडू शकतो.)
राष्ट्रीय अभ्यासक्रम रचना / नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क (एनसीएफ) २००५ याचा पाच मार्गदर्शक तत्त्वे अंतर्भूत करून कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला असून ती तत्त्वे हे दाखवून देतात:
१. अध्यायीकेंद्रित / विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रम (अध्यायी / विद्यार्थी केंद्रस्थता),
२. अध्यायीच्या / विद्यार्थ्याच्या क्षमतांवर आधारित (रचनात्मक अध्ययन) असे त्याचे किंवा तिचे स्वत:चे ज्ञान संवर्धित करणे ज्यामुळे अध्यायीला / विद्यार्थ्याला महत्त्व प्राप्त करून दिले जाते.
३. ज्ञानाचे संवर्धन सुकर होण्यासाठी अध्यापन (मार्गदर्शक म्हणून शिक्षक),
४. उपायांचे निदानोपयोगी मूल्यमापन (रचनात्मक साधन म्हणून परीक्षा)
५. अध्ययन प्रक्रियांचे परिष्करण आणि त्यांच्यातील सुधारणा (प्रक्रिया-परिणाम यावर आधारित दृष्टिकोन)
एनसीएफची ही तत्त्वे अंतर्भूत करून शिक्षणाचे एक नवीन उदाहरण निर्माण करणे आणि एकविसाव्या शतकातील समाजासाठी A3 (कोणीही, कधीही, कुठेही) संयुक्तता आणि टॅबलेट पीसी हे उपकरण यांचा वापर करून ते उदाहरण सामाजिक-आर्थिक तसेच सांस्कृतिक अशा प्रकारच्या सामाजिक विकासाशी जोडणे हे एक आव्हान आहे.